News34 chandrapur
चंद्रपूर - कामगारांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली, मात्र प्रत्यक्षात त्याचा लाभ कामगारांना मिळत नसल्याची बाब उघडकीस आली असून कामगारांची नूतनीकरण प्रक्रिया सुद्धा रखडली आहे. Bhumiputra brigade
चंद्रपूर जिल्ह्यात काही वर्षापूर्वी बांधकाम कामगारांची एकूण नोंदणी 2 ते 3 लाख पर्यंत होती, मात्र नूतनीकरण प्रक्रिया रखडल्याने आता ती संख्या केवळ 7 ते 8 हजार पर्यंत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
Labor law
नोंदणीकृत कामगारांच्या संख्येत घट झाल्यावर सुद्धा कामगार मंडळ त्यांना मूलभूत सुविधा देऊ शकत नाही आहे, त्या सुविधा कामगारांना मिळाव्या अशी मागणी भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केली आहे.
भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या वतीने कामगार आयुक्तांना विविध मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये कामगारांना सुरक्षा व अतिआवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, कामगाराचा काम करतेवेळी मृत्यू झाल्यास कुटुंबाला शासकीय लाभ मिळत नाही, शासनातर्फे घोषित शिष्यवृत्ती देण्यात यावी, विवाह, प्रसूती व घरकुल व मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, कामगारांचे नूतनीकरण करण्यासाठी मंडळाने पुढे यावे, मागील 2 वर्षांपासून नोंदणी करणारे अधिकाऱ्यांची नियुक्ती तात्काळ करावी व कामगार नोंदणी प्रक्रिया सुरळीत करण्यात यावी.
कामगारांसाठी 100 बेडचे हॉस्पिटलचे सुरू करावा, कामगारांसाठी घरकुल व पेन्शन योजना सुरू करण्यात यावी अश्या अन्य मागण्यांचा समावेश आहे.
सदर मागण्यांवर 8 दिवसांच्या आत कामगारांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा अन्यथा भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेतर्फे आंदोलन करण्याची भूमिका डॉ. अभिलाषा गावतुरे व शाहिदा शेख सहित इतर कामगारांनी दिला आहे.