News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल: : कृषि महाविद्यालय, मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचची तिसरी बैठक दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी भेजगांव ता. मुल येथे संपन्न झाली. सदर आयोजित कार्यक्रमा प्रसंगी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे तसेच शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्षमा विजय गुरनुले हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रम हा भेजगांव येथे श्री चलाख पाटील यांच्या शेतावर संपन्न झाला. या शेतकरी शास्त्रज्ञ मंच प्रसंगी सर्व शास्त्रज्ञ मंडळी हे शेतावर उपस्थिती होते.
Farmer Scientist Forum
या प्रसंगी सहयोगी अधिष्ठात डॉ विष्णुकांत टेकाळे यांनी शेती उद्योगांवर जास्त भर देण्याबाबत सांगितले. तसेच प्रत्येक शेतक-यांनी शेतीमधुन उत्पादन घेण्यासोबतच शेतमालावर प्रक्रीया करून योग्य प्रकार विक्री व्यवस्थापण करणे जरुरी असल्याबाबतचे सांगीतले. शेतक-यांनी आधुनिक पिक पध्दतीवर भर द्यावा व शेती पुरक उद्योग सुरु करावे असे आव्हान या प्रसंगी मा. डॉ. टेकाळे यांनी केले.
सदर शेतकरी शास्त्रज्ञ मंचा या बैठकीत मुख्यतेने "कापणी पश्चात तंत्रज्ञान" या विषयावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित शास्त्रज्ञ डॉ स्वप्नील देशमुख यांनी कापणी पश्चात तंत्रज्ञान याबाबत सविस्तर माहीती दिली. या मध्ये त्यांनी शेती मालावर प्रक्रीया करणे गरजेचे आहे. शेतातील टमाटर विकास भाव नसल्यास टमाटर पासुन टोमॅटो सॉस / केचप तसेच टोमॅटो पावडर, प्युरी आणि सिताफळापासुन गर पावडर तयार करणे. जांभळापासुन जाम / जेली या बाबत मार्गदर्शन केले. कापणी पश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब केला तरच शेतक-यांना नक्की नफा मिळेल असे त्यांनी या प्रसंगी सांगितले.
डॉ धम्मदिप वासनिक यांनी भेंडी पिकारील रोग व त्यावरील उपाय या बाबत माहीती दिली. या प्रसंगी श्री गुरुदास लिनगुरे या शेतक-यांनी चिकु झाडांची लागवड करण्याकरीता झाडांच्या उपलब्धीबाबत माहीती विचारली तर श्री विजय गुरनुले यांनी सफेद हळदीची प्रक्रीया व विक्री व्यवस्थापण याबाबत या प्रसंगी प्रश्न मांडले. याबाबतची माहीती व शंका समाधान डॉ स्वप्नील देशमुख यांनी केले. डॉ विजय राऊत यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले यामध्ये माती परिक्षणाचे महत्व व मातीचा नमुना कशा प्रकारे घ्यावा याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन माहीती दिली.