News34 chandrapur
Chandrapur latest news
माजरी - माजरी येथील रहिवासी विभा सिंह यांनी wcl माजरी क्षेत्राच्या व्यवस्थापनावर तिची १.२२ हेक्टर शेती सर्व्हे क्रमांक ११/१बी बळकावल्याचा आरोप केला आहे. wcl Chandrapur
वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी तक्रार पत्रात म्हटले आहे की, 2012 मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर ती जमीन पाहण्यासाठी गेली असता, त्यावर गौण खनिज टाकण्यात येत होते, त्यावेळी तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना त्याबाबत प्रश्न केला असता ते उत्तर न देता निघून गेले.
त्यानंतर वेळोवेळी महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन माझी शेती उद्ध्वस्त झाल्याची माहिती देऊन नुकसानभरपाई आणि नोकरीची मागणी केली, त्यानंतर डब्ल्यूसीएलच्या अधिकाऱ्याने न्यायालयातून पुरावे आणण्यास सांगितले. विभा सिंग यांच्याजवळ त्या जमिनीचा सातबारा आहे पण वेकोली जवळ तसा लिखित पुरावा नाही. तेव्हापासून न्यायालयात सात बाराची लढाई सुरू आहे. Allegation of land grabbing
वर्ष 2019 मध्ये विभा आत्महत्या करणार होती. त्यावेळी पोलीस स्टेशन आणि वेकोली व्यवस्थापनाने दोन महिन्यात नोकरी-भरपाई देण्याचे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासनचं राहिले,
तणाव आणि कलहामुळे मोठ्या मुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला.
सध्या ओव्हरबर्डन काढणारी खाजगी क्षेत्रातील एनसीसी कंपनीने त्या जमिनीवर माती आणि विटा टाकून छावणी उभारत आहे, ती विभा सिंह यांनी थांबवली आणि पाच दिवसात न्याय द्यावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला. Do justice or else suicide woman warned
कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा परिसरातील सर्व जमिनी कोळसा खाणींच्या नावावर करण्यात आल्या.सर्व्हे क्रमांक 11/1ब मध्ये मॅगझिन रूम होती,त्यामुळे ही जमीन वेकोलिच्या हद्दीत आहे. त्यावेळी सर्व जमिनी या कोळसा खाणींच्या नावावर करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी खासगी कंपनीचा कॅम्प त्या महिलेच्या विरोधानंतर बंद करण्यात आला आहे. न्यायालयाचा कोणताही आदेश असेल तर त्याची अंमलबजावणी आम्ही करू.
व्हीके गुप्ता (महाव्यवस्थापक) WCL
माजरी परिसर
At Majri in Chandrapur district, a woman has alleged that wcl grabbed the land in the name of the woman. The woman has warned the wcl management that one of my family members should be given a job and compensation or else I will self-immolate.