News34 chandrapur
बीड - 90 वर्षांपासून निजामकालीन प्रथा बीड जिल्ह्यातील विडा गावात सुरू आहे, या प्रथेत होळी च्या दुसऱ्या दिवशी म्हणजेचं धुलिवंदनाला जावयांची धिंड काढली जाते.
जावयाच्या गळ्यात चपलेचा हार, चेहऱ्यावर रंग लावत संपूर्ण गावभर सदर धिंड काढल्या जाते, हा प्रकार जरी अपमानास्पद असला तरी या प्रथेला जावई अल्प प्रमाणात प्रतिसाद देतात.
मात्र होळी आली की अनेक जावई गावातून पसार होतात. Holi festival 2023
यासाठी गावातील अनेक तरुण पुढाकार घेत जावई शोथ पथकाची स्थापना करतात व धुलिवंदन पर्यंत जावयांना देखरेखीखाली ठेवण्यात येते.
यंदा कुणाची धिंड निघणार असा प्रश्न शोध पथकाला पडला होता कारण अनेक जावई गावातून पसार झाले होते. Festival of colors
एक जावई त्या पथकाला आढळले व होळी दहनाच्या रात्री दीड वाजता झोपेतून अविनाश करपे यांना गावात आणण्यात आले.
यंदाचे मानकरी अविनाश करपे ठरले. युवराज पटाईत यांचे ते जावई आहेत.
जावई अविनाश करपे यांची गावात गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. तेव्हा सर्व गावकरी यामध्ये सहभागी झाले होते.
मिरवणूक झाल्यानंतर सर्वजण गावातील हनुमान मंदिराच्या पारावर जमले. गावकऱ्यांकडून जावयाला संपूर्ण पोषाखाचा आहेर करण्यात आला.