News34 chandrapur
चंद्रपूर - देश व राज्यातील राजकीय परिस्थिती ही आश्वासनांचा फुसका बार ठरत असून ही परिस्थिती आता स्थानिक राजकारणात पण दिसायला लागली आहे.
चंद्रपूर शहरातील राजकारणातील 2 दिग्गज मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांचं वैर शहरातील नागरिकांनी अनेकदा बघितलं आहे, शहराच्या विकासासाठी सुद्धा निधी आणला तर नेहमीच दोघांमध्ये श्रेयवादाची होड लागते.
असंच एक उदाहरण पुन्हा शहरातील नागरिक बघत आहे, एकोरी प्रभागातील नेहरू चौक ते चोर खिडकी पर्यंतचा रस्ता हा मागील 10 वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे.
पण आता ह्या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला मात्र ह्या रस्त्यावर काँक्रीटीकरण होणार की डांबरीकरण हे अद्याप स्पष्ट नाही कारण याबाबत प्रभागात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून 1 कोटी 67 लाख 1 हजार 740 रुपये नेहरू शाळा ते सम्राट चौकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व नालीच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आले तर आमदार किशोर जोरगेवार यांनी सुद्धा नेहरू शाळा ते चोरखिडकी या रस्त्याचे काँक्रीटीकरण साठी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले असे फलक एकोरी प्रभागात लावण्यात आले आहे.
दोन्ही जनप्रतिनिधी यांनी एकाच रस्त्यासाठी वेगळा निधी मंजूर केल्याने प्रभागातील नागरिक संभ्रमात आले आहे.
नागरिकांच्या मनात सध्या संभ्रम निर्माण झाला असून आता कोणत्या भाऊच्या रस्त्यावरून आपण चालायचे असा विचार नागरिकांच्या मनात येत आहे.
सध्या एकोरी प्रभागात लागलेले हे 2 फलक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.