News34 chandrapur
वरोरा - 22 मार्चला गुढीपाडवा मराठी नववर्ष या दिवशी गौरकार डॉक्टर दाम्पत्य आपल्या गावी जायला निघाले होते मात्र वाटेत त्या दाम्पत्यावर काळाने झडप घातली.
शहराजवळील शेंबळ गावाजवळ भरधाव ट्रक ने वणीकडे येत असलेल्या कारला जबर धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत कारला ट्रकने ओढत नेले. Terrible accident
या भीषण अपघातात तरुण महिला डॉक्टर दाम्पत्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना बुधवार दि. 22 मार्चला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली.
Chandrapur accident
डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (31) असे मृतक डॉक्टर चे नाव आहे. त्या पाच नंबर शाळे जवळ वास्तव्यास होत्या. तर त्या तीन दिवसापूर्वी येथील वणी ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार हे या अपघातात ठार झाले. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते.
डॉक्टर दाम्पत्य MH-34- AM- 4240 या कार ने वणीकडे येत होते तर विरुद्ध दिशेने ट्रक क्रमांक MH- 34-BZ-2996 हा ट्रक भरधाव वेगात होता. अचानक दोन्ही वाहने समोरासमोर भिडली. अपघात इतका भीषण होता की डॉक्टर दाम्पत्याच्या वाहन पुढील बाजूने चक्काचूर झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. तसेच पोलिसांना सुचविण्यात आले. जखमींला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.
गौरकार डॉक्टर दाम्पत्याला 1 वर्षाचे लहान बाळ आहे, या अपघाताने गौरकार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.