News34 chandrapur
चंद्रपूर - राज्य शासनाने 17 मार्च पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील एसटी बसेस मध्ये महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत लागू केली असून आतापर्यंत लाखो महिलांनी त्याचा लाभही घेतला आहे.
धक्कादायक : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शकाने गळफास घेत संपवलं आयुष्य
शासन निर्णयाच्या धर्तीवर चंद्रपूर-गडचिरोली खाजगी ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने सुद्धा ट्रॅव्हल्स मध्ये महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत लागू केली असून ती गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू केली आहे. 50 percent discount for women on travel
याबाबत चंद्रपूर-गडचिरोली खाजगी ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष चंदन पाल यांच्याशी सम्पर्क साधला असता त्यांनी सांगितले की राज्य शासनाने जो निर्णय शासकीय बसेस मधील प्रवासात महिलांना तिकिटावर 50 टक्के सवलत दिली त्या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो, त्या निर्णयाला अनुसरून आम्ही चंद्रपूर-गडचिरोली या मार्गावर चालणाऱ्या खाजगी बसेस मध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटावर प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. चंद्रपुरात भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू
त्याची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे, आम्ही ही सवलत चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर प्रवास करणाऱ्या महिलांना देणार असून आमच्या निर्णयाचे अनुसरन इतरही खाजगी ट्रॅव्हल्स असोसिएशने घेतल्यास त्याचा फायदा अनेक महिलांना होईल अशी प्रतिक्रिया चंदन पाल यांनी दिली आहे.
गुढीपाडवा सुट्टीचा दिवस असल्याने आज प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या कमी होती, मात्र दुसऱ्या दिवशी ही संख्या वाढणार असा आम्हाला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया चंदन पाल यांनी दिली.