News34 chandrapur
चंद्रपूर - कांग्रेस प्रणित विद्यार्थी संघटन NSUI च्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी शफाक शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Politics update
NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन व महाराष्ट्र प्रभारी नागेश करियप्पा यांनी शफाक शेख यांच्या विद्यार्थी क्षेत्रातील कार्यावर प्रभावित होऊन त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याआधी काही नेत्यांच्या माध्यमातून शफाक शेख यांना NSUI जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार करण्यात आले होते, शफाक हे 2 दिवसांसाठी जिल्हाध्यक्ष बनले मात्र स्थानिक पातळीवर त्याचा विरोध करण्यात आला.
शेख यांनी याआधी NSUI चंद्रपूर मध्ये विधानसभा अध्यक्ष, जिल्हा सचिव व महाविद्यालयीन अध्यक्ष सहित अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहे.
भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यात NSUI संघटनेचा विस्तार व कार्यकारिणीचे नवे बदल करून विद्यार्थ्यांसाठी चांगले काम करण्याचा मानस शेख यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
शफाक शेख यांनी सदर नियुक्तीबद्दल NSUI चे राष्ट्रीय सचिव रोशनलाल बिट्टू यांचे आभार मानले आहे.
शेख यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्रतिनिधींनी यांनी अभिनंदन केले आहे.