News34 chandrapur
गुजरात - पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल सुरत जिल्हा न्यायालयाने (surat court) गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांना दोषी ठरवले.
या प्रकरणात सुरत कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Rahul Gandhi Defamation Case
हे प्रकरण 2019 शी संबंधित आहे जेव्हा वायनाडचे लोकसभा सदस्य, राहुल गांधी यांनी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या आडनावावर टिप्पणी केली होती. त्यानंतर त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 'सर्व चोरांचे मोदी एकच आडनाव का असते?' असा आरोप राहुल यांनी केला होता. राहुल यांच्या या वक्तव्याविरोधात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती.
जाणकारांच्या मते, राहुल गांधी यांना दोषी ठरवल्यामुळे त्यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. राहुल गांधी यांनी न्यायालयात म्हटले असले तरी, 'माझा हेतू चुकीचा नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. दुसरीकडे अश्विनी चौबे म्हणाल्या की, 'राहुल गांधी न्यायालयाच्या कठड्यात आहेत, ते लोकशाहीच्याही कठड्यात आहेत. या मंदिरात येऊन माफी मागण्याचे धाडसही करू शकत नाही.
राहुल गांधी यांच्याविरोधात आयपीसी कलम ४९९, ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ते आज तिसऱ्यांदा न्यायालयात हजर झाले आहेत. मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला आणि निकाल जाहीर करण्यासाठी २३ मार्च ही तारीख निश्चित केली. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने राहुल गांधींना दोषी घोषित केले आहे.
खासदार राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा 'मोदी आडनाव' प्रकरणी करण्यात आली आहे. मात्र, त्याला 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.