News34 chandrapur
चंद्रपूर/चंदिगढ - काही महिन्यांपूर्वी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे लहान बंधू हितेंद्र अहिर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते, त्या दुःखातून सावरत असताना पुन्हा अहिर कुटुंबात धक्कादायक घटना घडली आहे. Hansraj ahir national obc commission chairman
हंसराज अहिर यांचे मोठे बंधू हरी अहिर यांचा मुलगा महेश अहिर याने चंदिगढ ला जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.
चंदिगढ येथील कजेहडी जंगलात 2 युवकांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत स्थानिक नागरिकांना आढळून आले होते, त्यांनतर स्थानिक परिसरात चांगलीच घबराट पसरली होती.
Commit suicide
स्थानिक नागरिकांनी याबाबत चंदिगढ सेक्टर 36 च्या पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरू केला, मृतकांमध्ये महेश अहिर व हरीश धोटे यांचा समावेश होता, हरीश व महेश हे दोघे जिवलग मित्र असल्याची माहिती मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी ते दोघेही कुणालाही न सांगता घरून निघून गेले होते, याबाबत चंद्रपूर शहर पोलिसात अहिर कुटुंबाने तक्रार सुद्धा नोंदविली होती, मात्र अचानक अशी घटना घडल्याने अहिर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Suicide or murder?
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन साठी पाठविले आहे, दोघांनी चंदिगढ येथे जाऊन आत्महत्या का केली? की दोघांची हत्या झाली याच कारण सध्या अस्पष्ट आहे.
दोघे तरुण हे कजेहडी गावातील हॉटेलात थांबले होते, त्याठिकाणी जवळ रेल्वे स्थानक व बस स्थानक आहे.