News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिह्यातील भद्रावती तालुक्यात नवरगाव बिट अंतर्गत मांगली गावात घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाला चोवीस तास उलटूनही पोलिसांना अद्यापही या प्रकरणात कुठलेही यश मिळाले नाही. Crime graph chandrapur
दोन शेतकऱ्याची मंदिरात चोरट्यांनी हत्या करीत दान पेटी पळवली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक यांनी घटनास्थळ गाठत जिह्यातील पोलिस यंत्रणेला सदर ठिकाणी बोलावले जिल्ह्यातील पडोली, रामनगर, घुघुस, वरोरा,शेगाव, माजरी, बल्लारपूर त्यासोबत दंगा नियत्रंण पथक, सायबर सेल आणि जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा इतका मोठा पोलिसांचा फौजफाटा बोलावून घेतला मात्र घटनेला 24तास उलटल्यावर ही पोलिसांना मात्र कुठलाही क्लु अजूनही गवसला नाही. Double murder case chandrapur
जिल्ह्यात गुन्हेगारीचां आलेख वाढत असल्याचा तसेच सबंधित प्रकरणाचा विधानसभा अधिवेशन मध्ये आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुद्दा उपस्थित केला यावर विधानसभा अध्यक्ष यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. चोरी,हत्या,यांचा जिल्ह्यात मोठा उद्रेक होत असल्याचे चित्र वास्तविकते मध्ये दिसत आहे. Major offenses pending
पडोली येथील बँक दरोड्या प्रकरणी अजूनही मुख्य आरोपी पोलिसांना मिळाले नाही, त्यासोबत चंद्रपुरातील लालपेठ परिसरातील 2 घरफोड्या, भानापेठ येथील घरफोडी असे अनेक गुन्हे आजही पोलीस स्टेशनमध्ये पेंडिंगचं पडले आहे.
मोठ्या गुन्हेगारीचा तपास करायला पोलिसांनाही वेळ मिळत नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे 14 मार्चला शहरातील महेश अहिर व हरीश धोटे यांच्या मिसिंग प्रकरणी चंद्रपूर पोलिसांना यश मिळाले नाही, 7 दिवसांनी दोघांचा मृतदेहच पोलिसांच्या हाती लागला.
सतत गुन्हेगारी आणि दुहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यातील पोलिसांची या आधीची कामगिरी आणि नवीन वर्षातील कामगिरी यामध्ये भरपूर अंतर बघण्यास मिळत आहे.
विधानसभा अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यात सतत गुन्हेगारी मध्ये वाढ होत असल्याची बाब आमदार किशोर जोरगेवार यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. Chandrapur police
जिल्ह्यात गुन्हेगारी अशीच वाढत राहली तर एकदिवस चंद्रपूर जिल्ह्याचं नाव गुन्हेगारी कॅपिटल च्या यादीत नक्कीचं समाविष्ट होणार.