News34chandrapur
चंद्रपूर - राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा पुतण्या महेश अहिर व त्याचा मित्र हरीश धोटे यांनी चंदिगड येथे जाऊन गळफास घेत आत्महत्या केली या घटनेनंतर अहिर व धोटे कुटुंबाला मोठा धक्का बसला.
मात्र ती हत्या की आत्महत्या यावर सध्या हे प्रकरण अडकले आहे, या हायप्रोफाईल प्रकरणी अनेक चर्चाना उधाण आले आहे.
14 मार्च ला हरीश धोटे व महेश अहिर हे दोघे मित्र बस ने प्रवास करीत चंद्रपूरातून बाहेर पडले, त्यानंतर नागपुरातील रेल्वे ने भोपाळ गाठले, त्यांनी आपला मोबाईल बंद केला जेणेकरून त्यांचं लोकेशन कुणाला मिळू नये.
15 मार्च ला चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दोघे बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली.
भोपाळ नंतर दिल्ली, ऋषिकेश, नंतर डेहराडून व त्यानंतर रेल्वेने त्यांनी चंदिगड गाठले.
चंद्रपूर पोलिसांना त्यांचं लास्ट लोकेशन भोपाळ व दिल्ली मिळाले पथक पोहचले मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. Mahesh Ahir suicide case
विशेष म्हणजे चंद्रपूर पोलिसांनी अनेक भागातील सीसीटीव्ही तपासून बघितले असता त्यामध्ये दोघे बिनधास्त फिरताना आढळून आले होते, बस, रेल्वे स्थानकांवर सुद्धा ते दोघे कॅमेऱ्यात कैद झाले.
शेवटच्या चंदिगड येथील सीसीटीव्ही मध्ये ते दोरी घेताना आढळले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यांनतर चंदिगड येथील जंगलात दोघांचे मृतदेह पोलिसांना गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाले.
The end of a close friendship
शेवटच्या क्षणी काय झालं असेल?
याबाबत अद्यापही काही उलगडा झाला नाही, चंदिगड पोलिसांच्या मते त्या दोघांनी आत्महत्या केली असा त्यांनी दावा केला आहे.
दोघांच्या मृतदेहा जवळ दारू च्या बॉटल आढळल्या पण त्यांचे मोबाईल पोलिसांच्या हाती लागले नाही हे विशेष.
महेश व हरीश हे दोघे जिवलग मित्र होते, दोघे नेहमी सोबत असायचे, कुणाची जरी प्रकृती बरोबर नसली की एकमेकांना दवाखान्यात सुद्धा ते घेऊन जायचे मग या जिवलग मैत्रीचा असा दुःखद अंत का झाला असेल? अश्या अनेक प्रश्नांचे उत्तर न देता दोघांनी अर्ध्यावर डाव सोडत जगाचा निरोप घेतला पण का?
मात्र आत्महत्या करण्यासाठी दोघांनी हजारो किलोमीटर दूर असलेलं चंदिगड का गाठलं असेल?
दोघे कोणत्या कारणासाठी घरून निघून गेले?
आत्महत्येसाठी चंदिगड का निवडल्या गेलं?
धोटे व अहिर यांच्या कुटुंबाला दोघांबाबत काही माहिती नसेल का?
दोन जिवलग मित्रांनी असा टोकाचा निर्णय का घेतला?
दोघांची समस्या एकच असेल काय? एकाच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार मग दुसर्याने त्याला का साथ दिली असेल?