News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांपासून अनेक पतसंस्था, बॅका या गोरगरीब शेतमजूर, जनतेचा आर्थिक फसवणूक करून पळ काढण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहे. Chandrapur scam
त्यामुळे पतसंस्थेवर प्रशासनाचा वचकअजिबात दिसत नाही आहे, डी.डी.आर. ऑफिस, ऑडिट विभाग यांचे पतसंस्थेवर कुठल्याच प्रकारचे नियंत्रण दिसून येत नाही त्यामुळे सामान्य जनतेने विश्वास कुठल्या पतसंस्थेवर ठेवायचा अशा संभ्रमावस्थेत आहे. अशीच एक घटना चंद्रपूरात काही दिवसांपूर्वी शहरातील बाबूपेठ या प्रभागात घडली होती. Investment scam

रोज नागरी पतसंस्था यामध्ये ठेविदारांचे लाखो रुपये बुडाले. आरोपींना शिक्षा झाली, परंतु आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अत्यंत संथ गतीने चौकशीचे काम सुरू आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. व कुठेतरी पतसंस्थेतील पदाधिकारी व प्रशासन यांचे साटेलोटे तर नाही ना असा संशय निर्माण झालेला आहे. चौकशी नंतर जप्तीची पुढील कार्यवाही कीत्येक महीने लोटून गेल्यानंतर सुध्दा होत नाही आहे. Aam Aadmi Party chandrapur ठेवीदारांनी हताश होऊन आम आदमी पार्टी चंद्रपूरकडे याबाबत तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच आपचे जिल्हाध्यक्ष यांनी संबंधित विभागाशी प्रत्यक्ष भेटून कारवाई करण्यास सांगितले. यानंतरही काही हालचाली न दिसल्याने आज जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना सर्व ठेवीदारा सोबत घेत भेट घेतली. Chandrapur latest news
संबंधित प्रकरणात दोषी असणारे आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करून पीडित गोरगरीब जनतेचा पैसा परत कसा मिळवून देता येईल यावरती कार्यवाही करायला सांगितले या वेळेला उपस्थितामध्ये जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे, महिला अध्यक्षा ॲड. सुनिताताई पाटील, शहर सचिव राजूभाऊ कुडे, कृष्णाजी सहारे, दीपक चुनारकर,अक्षय गोवर्धन, संकेत गोरडवार, राजेंद्र जिल्लेवार, विष्णू गुजरे, नगेश्र्वाष्वर गुजेले, रविना गूजेले, विनायक शामकुडे, कावेरी, लक्ष्मी देवगडे, उज्वला लोनबले, आरुषी फुलझले इत्यादी उपस्थित होते.