News34 chandrapur
चंद्रपूर - शिवगर्जना यात्रेनिमित्त चंद्रपुरात आलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजप वर गंभीर आरोप केले होते.
खैरे यांनी आपल्या भाषणात व पत्रकार परिषदेद्वारे पालकमंत्री मुनगंटीवार यांनीच हंसराज अहिर यांना लोकसभा निवडणुकीत हरविले असा घनघणात आरोप केला. Hansraj ahir bjp
खैरे यांच्या आरोपामुळे भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.
खैरे यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी चंद्रपूरचे माजी खासदार व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी खैरे ची भेट सुद्धा घेतली होती.
खैरे यांच्या आरोपावर माजी खासदार व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. Chandrapur breaking news
चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत होऊ शकत नाही आमच्या पक्षात भांडणे लावण्याचा त्यांचा मानस आहे. जे आपला पक्ष सांभाळु शकले नाहीत त्यांच्या या वक्तव्याला मी महत्व देणार नाही. त्यांचे हे वक्तव्य माझ्या भेटीच्या एक दिवस पूर्वीचे होते. याची मला कल्पना असती तर मी भेट टाळली असती.
हंसराज अहिर, ओबीसी आयोग अध्यक्ष