News34 chandrapur
Chandrapur latest News - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली होती.
गुजराती भाषा तसेच साहित्याच्या उन्नती व उत्तेजनासाठी गुजरात साहित्य अकादमी या समितीची पुनर्रचना करण्यात आल्याने सदर समितीमधील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या.
या समितीची पुनर्रचना करावी ही बाब शासनाच्या विचाराधीन होती, सांस्कृतिक मंत्रालयाच्या आदेशाने समितीमध्ये नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
विशेष बाब म्हणजे चंद्रपूर शहरातील सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उर्वशी माणेक यांची गुजरात साहित्य अकादमी च्या समितीमध्ये वर्णी लागली आहे.
समितीचे अध्यक्ष म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री, प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य विभाग) सदस्य, सदस्य सचिव म्हणून सहसंचालक, महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी हे शासकीय सदस्य म्हणून समितीचे कामकाज बघणार असून समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून कार्याध्यक्ष स्नेहल मुझुमदार, सदस्य हिरेन मेहता, श्रीमती वर्षा अडलजा, डॉ. उर्वशी माणेक, निरंजन पंड्या, डॉ. मोनिका ठक्कर, विजय जानी, दिनकर जोशी, सौरभ शहा, हितेन आनंदपारा, मुकेश जोशी, डॉ. प्रीती जरीवाला, दीपक मेहता, डॉ. खेवना देसाई, डॉ. वसंत मारू, संजय पांड्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर गुजरात साहित्य अकादमी च्या सर्व सदस्यांची नियुक्ती ही पुढील 3 वर्षापर्यंत किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असणार आहे.