वातावरणातील अचानक बदलामुळे व्हायरलच्या तापाने डोकेदुखी वाढवल्याने घरोघरी सर्दी, खोकला अन् तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. काही रुग्णांचा ताप आठवडाभर, तर खोकला दोन आठवड्यांच्या वर जात असल्याने ‘एच३एन२’चा धाेका वाढला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबमध्ये एका रुग्णाचा ‘एच३एन२’ अहवाल पॉझिटिव्ह आला हाेता. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अवश्य वाचा - हंसराज अहिर यांना लागली मंत्रिपदाची लॉटरी
H3N2 पासून बचाव कसा करावा..?
कोरोना गाइडलाइनचे कठोर पालन करावे लागेल. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग बचावाची सर्वात चांगली पद्धत आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जास्त दिवस खोकला आणि सर्दी राहिल्यास डॉक्टरांकडे जा. एच3एन2 एनफ्लुएंझावर अजून कोणतीही लस नाही. यावरील उपचारात अँटिव्हायरल औषधींचा वापर होतो. आयएमएने एच3एन2 मध्ये डॉक्टरांना अँटिबायोटिक औषधींचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.
What is the H3N2 virus?
H3N2 म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिलेल्या माहितीनुसार
इनफ्लुएंझा व्हायरस चार प्रकारचा असतो A, B, C, D असे चार प्रकार त्यात असतात. त्यातल्या A-B टाइपचे व्हायरस हे वातावरणातल्या बदलांमुळे पसरतात आणि आजारांचा प्रादुर्भाव होतो. इनफ्लुएंझा A हा टाइम महामारीसाठीही ओळखला जातो. या टाइप A चे दोन सबटाइम असतात एक असतो H3N2 आणि दुसरा H1N1. इनफ्लुएंझा टाइम B चे सबटाइप नसतात. टाइप सी हा फारसा गंभीर नाही. तर टाइप डी हा प्राण्यांमध्ये असतो.
ICMR ने दिल्या माहिनुसार गेल्या काही महिन्यांपासून करोनाची प्रकरणं कमी झाली आहेत. मात्र H3N2 प्रकरणं वाढत आहेत. १५ सप्टेंबर नंतर H3N2 ची प्रकरणं वाढली आहेत.
H3N2 ची लक्षणे काय?
What are the symptoms of H3N2 virus?
Who ने दिलेल्या माहितीनुसार H3N2 संक्रमित रूग्णांमध्ये खोकला, कोरडा खोकला, ताप, डोकेदुखी, सांध्यांमध्ये दुखणं, थकवा येणं, गळ्यात खरखर आणि नाक वाहणं ही लक्षणं दिसतात. सुरूवातीला अनेक रूग्णांना ताप येतो त्यानंतर सर्दी, खोकला आणि अंगदुखी तसंच इतर लक्षणं दिसू लागतात असंही WHO ने म्हटलं आहे. तसंच अनेक रूग्णांमध्ये ताप आला पाच ते सात दिवसात बरा होतो पण सर्दी-खोकला बरा व्हायला दोन ते तीन आठवडे जातात.
धोका कुणाला?
Who is most at risk of H3N2 virus?
इनफ्लुएंझाची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. मात्र या आजाराचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, म्हातारी माणसं आणि आजारांशी लढणारे रूग्ण यांना जास्त धोका असू शकतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असा सल्ला WHO ने दिला आहे.