News34 chandrapur
मुंबई/दिल्ली - देशात कोरोना नंतर आता नव्या विषाणूचा धोका वाढला आहे, H3N2 Influenza या नव्या व्हायरस ने देशात दोघांचा मृत्यू झाल्याने पुन्हा नवं संकट उभं राहणार की काय? यावर केंद्र सरकारच्या नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव व राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेत कोविड प्रोटोकालचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहे.
H3N2 Influenza outbreak
राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सूचित करावा असे निर्देश दिले आहे.
हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्दी आणि सततचा खोकला यावर औषधही बेजार झाली आहेत. औषधं घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळताना दिसत नाहीय. हा व्हायरल संसर्ग H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होत आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू H1N1 इन्फ्लूएंझा विषाणूचा उपप्रकार म्हणजेच बदललेलं स्वरुप आहे.
देशात व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गामुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे. त्यामुळे कोरोना विषाणू (Coronavirus) प्रमाणे आता H3N2 विषाणू तांडव करणार की काय असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं सल्ला देत मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
H3N2 विषाणू संसर्गाची लक्षणं
H3N2 इन्फ्लूएंझा हा व्हायरल फ्लू आहे. याची लक्षणे कोरोना प्रमाणेच आहेत. ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत.
H3N2 Influenza symptoms
H3N2 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
- फ्लूवरील वार्षिक लस घ्या.
- हात नियमितपणे स्वच्छ धुवा. विशेषत: टायलेट नंतर, जेवणाआधी तसेच चेहरा किंवा नाकाला स्पर्श करण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा.
- शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
- आजारी व्यक्तींपासून दूर राहा.
H3N2 is a strain of the influenza virus that can cause flu in humans. It is one of the many subtypes of the influenza A virus. Like other flu viruses, H3N2 can cause respiratory symptoms such as coughing, fever, and body aches. It can also lead to more severe complications in vulnerable populations such as the elderly, young children, and people with underlying health conditions.
The H3N2 strain of influenza virus can change and mutate over time, which is why it is important to get a flu vaccine every year to protect against the latest strains. Additionally, practicing good hygiene habits such as washing hands regularly, covering coughs and sneezes, and staying home when sick can help prevent the spread of the virus.
If you are experiencing flu-like symptoms, it is important to seek medical attention, particularly if you are in a high-risk group. Your healthcare provider can recommend appropriate treatments to help alleviate your symptoms and prevent complications.