News34 chandrapur
गोंडपीपरी - हेटी नांदगाव येथील पाणी पुरवठा चार दिवसांपासून बंद असल्याने हेटी नांदगाव सह, सकमुर, गुजरी,चेकनंदगाव, कुडेनांदगाव, टोलेनांदगाव पाणीपुरवठा ठप्प आहे.
सकमुरात नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने गढूळ पाण्याने तहान भागवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.
आज दि.३ शुक्रवारी गावकऱ्यांचा उद्रेक झाला असून तेलंगणा महाराष्ट्राला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक गावकऱ्यांनी अडवून संताप व्यक्त केला आहे. तासांभरापासून आंदोलन सुरू असून कोणतेही अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने आंदोलन कोणते वळण घेईल याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले असून ग्रामपंचायत विरोधात घोषणाबाजी आंदोलक गावकरी देत आहे.