News34 chandrapur
चंद्रपूर - नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघात 12 वर्षांनी भाजपचा अभेद्य किल्ला अडबाले यांनी उध्वस्त करीत गड जिंकला. MLC election results
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर अनेक राजकीय घडामोडी झाल्या होत्या, शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर ऐनवेळी उमेदवारांना अर्ज परत घ्यायला लावला मात्र राष्ट्रवादी कांग्रेसच्या उमेदवाराने अर्ज परत न घेतल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. Election results
शिवसेना पक्षांच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यावर विदर्भ माध्यमिक संघाचे सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला, 2 वेळ आमदार शिक्षक परिषद व भाजप चे नागो गाणार, शिक्षक भारतीचे झाडे यांच्यात लढत रंगली होती.
यंदा मुद्दा होता जुन्या पेन्शनचा मात्र 2 वेळ शिक्षक मतदार संघाचे आमदार पद भूषविल्यावर सुद्धा जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर कठोर भूमिका न घेणाऱ्या गाणार यांना यावेळी चांगलाच फटका बसला. Teacher Constitution nagpur
शिक्षक परिषद व भाजप नागपूर मतदार संघातून नव्या उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी अनेकांनी केली मात्र यावेळी सुद्धा शिक्षक परिषद व भाजपने गाणार यांना पुन्हा उमेदवारी देत राजकीय खेळी केली, मात्र ती खेळी अयशस्वी ठरली. गाणार यांच्या उमेदवाराने संघटना व पक्षाअंतर्गत कलह होता.
विशेष म्हणजे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडत आहे, विदर्भातील अनेक शिक्षकांच्या समस्या त्यांनी सोडविल्या आहे.
मात्र नागो गाणार यात अयशस्वी ठरले, त्या संधीचा फायदा अडबाले यांनी घेतला.
मागील निवडणुकीत शिक्षक भारती संघटनेचा उमेदवार 2 ऱ्या क्रमांकावर होता मात्र यंदा अत्यंत कमी मत शिक्षक भारतीच्या उमेदवाराला मिळाले.
एकंदरीत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याने इतिहास घडविला, पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांचा विजय, चंद्रपूर विधानसभेत अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा ऐतिहासिक विजय व आता सुधाकर अडबाले यांनी भाजपच्या गडाला खिंडार लावत विजय मिळविला.