News34 chandrapur
चंद्रपूर:- नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्यातील 34 पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती, बदलीमुळे अनेक अधिकाऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम असे वातावरण तयार झाले होते, प्रशासकीय आदेश असल्याने काहींनी पदभार घेतला तर काहीनी अजूनपर्यंत पदभार स्वीकारला नाही. Chandrapur police
मात्र या सर्व बदली सत्रात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची चर्चा सध्या जोरात सुरू आहे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची बदली होताच त्यांनी केबिनमध्ये लावलेले सर्व साहित्य काढून नेले.
Local crime branch chandrapur
आपल्या कार्यालयातील टॉयलेटचे दार, खुर्ची-टेबल, AC, पडदे आणि दिवे काढून नेले. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात हा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय.
चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्वशक्तिमान पोलीस अधिकारी बाळासाहेब खाडे यांची याच कार्यालयात गुरुवारी मानव संसाधन विकास विभागात बदली झाली. त्यांनी बदलीने नाराज होत तातडीने शुक्रवारी कार्यालयात येत स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयातील या वस्तू काढून नेल्या. या सर्व वस्तू त्यांनी स्वखर्चाने लावल्याचा त्यांचा दावा आहे. खाडे यांचा स्थानिक गुन्हे शाखेत 2 वर्ष 3 महिन्याच्या कार्यकाळ पूर्ण झाला होता. विशेष म्हणजे यात दारूबंदीच्या महत्वाच्या कार्यकाळाचा समावेश होता. गुरुवारी पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील 34 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र बदली नंतर बाळासाहेब खाडे यांनी केलेल्या या कृत्यामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. नवीन आलेल्या पोलीस निरीक्षकानी पोलीस दलाची बदनामी होऊ नये म्हणून तातडीने पोलिस निरीक्षकाच्या कार्यालयाच्या डागडुजीला सुरुवात केली. या प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे माजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनीही बोलण्यास नकार दिला आहे. खाडे यांना पोलिस निरीक्षक दर्जाच्या शासकीय कार्यालयात अधीक्षक दर्जाची सजावट स्वखर्चाने करण्याची परवानगी कुणी आणि कशी दिली. याशिवाय बदली झाल्यावर हे साहित्य काढून नेल्यावर कोण आणि कशी कारवाई करणार हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. Police transfer
विशेष बाब म्हणजे या सर्व अधिकाऱ्यामध्ये प्रामाणिक अधिकारी हे तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोकाटे होते, त्यांनी कसलीही चमक धमक न दाखवीता आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित केले होते.
मात्र खाडे यांनी पदभार स्वीकारल्यावर आपल्या मर्जीने त्यांनी केबिन सजविले, आता त्यांची बदली झाल्यावर सर्व साहित्य काढून घेतले असले तरी त्या केबिन ची चमक नवे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार पूर्ववत करणार आहे, मात्र सध्या सुरू असलेल्या डागडुजी चा खर्च कोण करीत आहे, याबाबत कोंडावार यांना सम्पर्क केला असता त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही.