News34 chandrapur
चंद्रपूर - तेलंगाणा राष्ट्र समिती ने देशाच्या राजकारणात प्रवेश घेत भारत राष्ट्र समिती नावाचा पक्ष स्थापन करीत महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला आहे.
आज नांदेड येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात अनेक माजी आमदारांनी तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री BRS चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत BRS मध्ये प्रवेश घेतला, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभेचे माजी आमदार राजू तोडसाम व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेचे माजी आमदार दीपक आत्राम यांनी जिल्हापरिषद सदस्य व नगरसेवकांसाहित BRS पक्षात प्रवेश केला. यासोबतच शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी सुद्धा BRS मध्ये जाहीर प्रवेश केला.
आत्राम यांनी आविस च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात नावलौकिक स्थापन करीत जिल्हा परिषद व नगर परिषदेत नगरसेवक निवडून आले होते.
पुढच्या वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दीपक आत्राम यांनी विधानसभा क्षेत्र पिंजून काढला आहे, राज्यात BRS च्या एंट्रीने अनेक बड्या पक्षांना राजकारणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आंध्रप्रदेश राज्यातून तेलंगाणा राज्याची निर्मिती करण्यासाठी चंद्रशेखर राव म्हणजेच KCR यांचा महत्वाचा वाटा आहे.
राज्यात अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे, अश्यातच BRS ची एन्ट्री वेगळ्या विदर्भाच्या आशा फुलविणारी आहे.