News34 chandrapur
चंद्रपूर- मुकूटबन, यवतमाळ जिल्ह्यातील रिलायन्स सिमेंट कंपनी प्राय. लिमी. च्या कोरपना तालुक्यातील ग्राम-परसोडा व परिसरामधील लाइमस्टोन लीज limestone lease क्षेत्रातील शेतजमिनीचे अधिग्रहण, सिध्दबली इस्पात लिमी. मधील पूर्व मागासवर्गीय कामगारांचे प्रलंबित वेतन व नोकरी तसेच केपीसीएल बरांजशी संबंधित शेतजमिनींचा प्रलंबित मोबदला, प्रकल्पग्रस्तांना रोजगार, कामगारांचे प्रलंबित वेतन व गावाचे पुनर्वसन संबंधातील प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने व संबधीत प्रकरणांशी सर्वाधिक मागासवर्गीय निगडीत असल्याने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाव्दारे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे दि. 07 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निर्देशानुसार व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरील उल्लेखित बाबींवर जिल्हाधिकारी, संबंधीत विभागाचे अधिकारी, सर्व कंपन्यांच्या प्रबंधनांचे वरिष्ठ अधिकारी, प्रकल्पपिडीत अन्यायग्रस्त शेतकरी, पूर्व कामगार आदींच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी पार पडणार आहे.