News34 chandrapur
चंद्रपूर - देशात वाढणारा कट्टरवाद, महागाई, बेरोजगारी, नागरिकांच्या मूळ समस्या काय? यासाठी माजी कांग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी 4 हजार 80 किलोमीटर कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर 2022 मध्ये सुरू केली होती.
Rahul gandhi
Rahul gandhi
यात्रेचा समारोप 30 जानेवारीला श्रीनगर येथील लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवित करण्यात आला.
या यात्रेत सुरुवाती पासून ते समारोप पर्यंत चंद्रपुरातील एक तरुणी राहुल गांधी सोबत पायदळ चालून गेली. Bharat jodo yatra
चंद्रपूर जिल्ह्याचे माजी कांग्रेस अध्यक्ष सुभाष गौर यांची कन्या प्रेरणा गौर यांनी राहुल गांधी यांच्या समवेत तब्बल 4 हजार किलोमीटर चा पायदळ प्रवास केला.
11 फेब्रुवारीला स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत प्रेरणा यांनी भारत जोडो यात्रेमधील अनुभव काय होते? याबाबत चर्चा केली.
प्रेरणा ने याबाबत माहिती दिली की सुरुवातीला आम्ही घाबरलो, कारण 4 हजार किलोमीटर प्रवास हा सोपा नाही.
सुरुवात ते समारोप पर्यंत 120 नागरिक ज्यामध्ये 40 महिला व 80 पुरुष होते, आम्हाला अनेक अडचणी आल्या मात्र पक्षाचा नेता खंबीरपणे पायदळ चालत व आम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आमचा आत्मविश्वास जागृत करीत होता, त्यांच्या बळावर आम्ही पायदळ प्रवास केला.
आम्ही प्रत्येक राज्य, जिल्हा व गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या मूळ समस्या जाणून घेतल्या.
प्रत्येक राज्यातील नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट, देशातील वाढती महागाई व बेरोजगारी ही चिंतेची बाब असल्याचे अनेक नागरिकांनी राहुल गांधी यांच्या समक्ष ठेवली.
भारत जोडो यात्रेमुळे आम्ही खूप काही शिकलो, एक चांगला संदेश घेऊन आम्ही समाजात काम करू अशी प्रतिक्रिया प्रेरणा यांनी दिली.
चंद्रपुरातील प्रेरणा गौर कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होत्या ही बाब त्या परत आल्यावर अनेकांना कळली.
राहुल गांधी यांनी या यात्रेच्या माध्यमातून नव्या बदलाचे वारे निर्माण करीत देशातील नागरिकांना या यात्रेत जोडण्याचे काम केले असले तरी स्थानिक कांग्रेस आपसात कधी जुडणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात भारत जोडो यात्रेचं आगमन झाले त्यावेळी अनेक नेते व त्यांचे राजकारणी मुलानी या यात्रेत सहभाग घेत स्वतःचे व्हिडीओ काढत आम्ही सुद्धा पायी चालणार असे दाखवीत, यात्रेतून काढता पाय घेतला.
मात्र प्रेरणा ही एकमेव मुलगी होती जी शेवटपर्यंत या यात्रेत सहभागी होती.