News34 chandrapur
चंद्रपूर : मूल तालुक्यातील चितेगाव येथे बनावट देशी दारू निर्मिती कारखान्यावर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून मोठे रॅकेट उघडकीस आणले तसेच इतर बाबी जप्त केल्या. Fake country liquor
याप्रकरणी तातडीने कारवाई करून फरार असलेल्या आरोपींना त्वरीत अटक करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिल्या.
State Excise Department
बनावट देशी दारू निर्मिती कारखान्यासंदर्भात नोंदविलेल्या गुन्ह्याबाबत जिल्हाधिका-यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील तसेच दुय्यम निरीक्षक तथा तपास अधिकारी संदीप राऊत यांची बैठक घेऊन गुन्ह्यातील कागदपत्रांची तपासणी केली. तसेच फरार असलेल्या लोकांना त्वरीत अटक करून कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. या प्रकरणात समावेश असलेल्या लोकांवर एमपीडीए व मुंबई दारुबंदी कायद्याचे कलम 93 नुसार कारवाई करण्याबाबतही त्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. Mumbai Liquor Prohibition Act