News34 chandrapur
चंद्रपूर : राज्यात फुटबॉल खेळाचा विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला आहे. german football club bayern munich
Football club Bayern Munich फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लब पैकी एक आहे. त्याअनुषंगाने, जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दि. 14 व 15 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील शाळांनी आपल्या शाळेतील 14 वर्षाआतील मुलांच्या संघाची नोंदणी, प्रवेशिका विहित नमुन्यात दि. 1 ते 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावे. तसेच अधिक माहितीकरीता क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके 9975862469 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

Chandrapur football player
क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांच्या करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मनी येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील 14 वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. Football match
फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यातून निवडलेल्या 20 खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, निवास व प्रशिक्षण आदी बाबींवर खर्च करण्यात येणार आहे.
Germany
राज्यातून 20 खेळाडू जर्मनी येथे सदर प्रशिक्षणासाठी जाण्याकरीता क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषदेअंतर्गत एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे 14 वर्षाआतील मुलांच्या गटाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे.