News34 chandrapur गुरू गुरनुले
मूल : शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे डुकरे दिसून येत आहेत. शहरात मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम मूल नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. डुक्कर पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, शहरातील मोकाट जनावरे बाहेर सोडण्यात येणार आहेत. free animals
उपरोक्त कारवाई करण्यात येत आहे. शहरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात डुकरे मोकाट फिरत असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणत आहेत. मोकाट डुकरे शहरातील रस्त्यावर कुठेही मलमूत्र विसर्जन करून साथरोग प्रसार करण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने कारवाई सुरु केली आहे.
शहरांमध्ये अनेकांनी बेकायदेशीर रित्या वराहपालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी आपली डुकरे निर्जनस्थळी, वस्तीविरहित ठिकाणी बंदिस्त करून ठेवावेत. Pig free
मुख्याधिकारी यांनी वारवार तोंडी तथा लेखी सूचना देऊन डुक्कर पालन करणाऱ्यांना मोकाट डुक्कर पकडुन शहराबाहेर बंदोबस्त करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली त्यानुसार त्यांनी मोकाट डुक्कर पकडुन शहरा बाहेर नेण्याची व्यवस्था केली आहे.
मूल नगरपालिकेच्या हद्दीत मोकाट डुकरे फिरताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. मोकाट डुकरे फिरणार नाही, याची विशेष काळजी वराहपालन व्यावसायिकांनी स्वतः घ्यावी अन्यथा त्यांचे आर्थिक नुकसान झाल्यास मूल नगरपालिका जबाबदार राहणार नाही, ही कारवाई करून आपल्या डुकरांचा बंदोबस्त डूकर मालकांनी स्वतः करावा, अशा सूचना तथा इशारा मूल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी दिल्या आहेत.