News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - खासदार राहुलजी गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो पायी पदयात्रेच्या संकल्पनेतून ग्रामीण जनतेशी हात से हात जोडो अभियान राबविण्याचा संकल्प भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने जाहीर केल्याने मुल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रकाशित केलेल्या नवीन वर्ष २०२३ ची डायरी आणि दिनदर्शिका शहरी व ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्त्या पर्यंत पोहचावी या उदात्त हेतूने नवीन वर्षाची भेट म्हणून देण्यात यावी. Congress news
असे ठरवून काँग्रेस नेते आमदार तथा माजी पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात व ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार सुभाषभाऊ धोटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री. संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात व पुढाकाराने तालुक्यातील ग्रामीण सरपंच, उपसरपंच, सदस्य, यांचेसह सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष,सचिव यांना भेट म्हणून देण्यात आली. याप्रसंगी मुल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष, माजी नगर परिषद उपाध्यक्ष राकेश रत्नावार, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संदीप करमवार, यांचे हस्ते वाटप करुन हात से हात जोडो अभियानाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामीण मुल तालुक्यातील बेंबाळ ग्राम पंचायत सरपंच चांगदेव केमेकर, आकापुर ग्रा. पं. सरपंच भास्कर हजारे, कोसंबी ग्रा.पं.सरपंच रवींद्र कामडे, चकदुगाळा सरपंच प्रीती नरेश भांडेकर, विराई सरपंच प्रदीप वाढई, कांतापेठ राजेंद्र वाढई, अजय नैताम, भगवांनपुर सरपंच रामदास हजारे, बाबराळा ग्रा. पं.सरपंच धीरज गोहने , सुमित पाटील आरेकर, उसराळा लोकनाथ नर्मलवार, चांदापुर सोनिताई कालिदास देशमुख, चिखली दुर्वास कडस्कर, यांना डायरी व दिनदर्शिका भेट देऊन हात से हात जोडो अभियानाची सुरुवात करण्यात आली. अभियानाबाबत काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी अभियानाबाबत माहिती देऊन आलेल्या सर्व ग्राम पंचायत सरपंच व काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.