News34 chandrapur
चंद्रपूर/जिवती - तालुक्यातील पिट्टीगुडा येथे 24 जानेवारीला एका मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, त्या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला सिकंदराबाद येथून अटक केली आहे. Brutal murder
Chandrapur police
Chandrapur police
पल्लेझरी येथे राहणारी मुलगी मीरा गुरुदेव सहारे यांचा निर्घृण अवस्थेत असलेला मृतदेह गावकऱ्यांना आढळला होता, याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची गंभीरता बघता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी पथक तयार करीत पुढील तपासाच्या सूचना दिल्या. Chandrapur crime
SDPO नायक यांनी पथकाला मार्गदर्शन करीत तपास सूरु केला असता गुन्ह्यातील पसार आरोपी हा सिकंदराबाद येथे असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी सिकंदराबाद गाठत त्या पसार आरोपीला अटक केली.
24 जानेवारीला गुन्हा घडल्यावर, घटना कशी घडली नेमकं वाद काय? याबाबत सखोल तपास करीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करीत गुन्हा उघडकीस आणून पसार आरोपीला अटक केली. Crime murder
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
हत्येचं नेमकं कारण काय? हे पुढील तपासात उघडकीस होणार, या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक करीत आहे.