News34 chandrapur
चंद्रपूर : तहसील कार्यालय, चंद्रपूर येथील पथकाद्वारे अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक करताना आढळून आलेल्या वाहनांच्या वाहन मालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. Tehsil office chandrapur
परंतु, वाहन मालकांनी त्यांच्यावर ठोठाविण्यात आलेली दंडाची रक्कम त्यांना वाजवी संधी देऊनही अद्यापपर्यंत सरकार जमा केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या तरतुदींना अधीन राहून सदर दंडाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सदर वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे.
Auction of impounded vehicles
या लिलावामध्ये ट्रॅक्टर, हाफटन,जेसीबी, हाफबॉडी ट्रक, तीनचाकी ऑटो, ट्रक आदी वाहनांचा समावेश आहे, असे चंद्रपूरचे, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी कळविले आहे.