News34 chandrapur
चंद्रपूर/बल्लारपूर - 19 फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास वरवट गावातील शेतकरी 60 वर्षीय किसन गंगाराम लोनबले हे जुनोना येथील तलावात अंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. Sad news
19 फेब्रुवारीला जुनोना गावात नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला किसन लोणबले गेले होते, अंत्ययात्रेनंतर ते अंघोळीसाठी तलावात उतरले, मात्र पोहत असताना ते दूरवर गेले.
मात्र परत येत असताना ते तलावात बुडायला लागले, यात लोणबले यांचा मृत्यू झाला.
दिवसभर लोणबले यांचा मृतदेह गावकऱ्यांना न गवसल्याने चंद्रपूर पोलिसांच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असता 20 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता किसन लोणबले यांचा मृतदेह बचाव पथकाला मिळाला.
नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला आलेल्या लोणबले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.