News34 chandrapur प्रशांत गेडाम
सिंदेवाही - तालुक्यातील वनपरीक्षेत्रातील मरेगाव क्षेत्रातील कक्ष क्रमांक 276 R. F. खैरी, पवनपार या ०१ की. मी. अंतरावर बिबट आणि पट्टेदार वाघाच्या झुंजीत बिबट जागीच ठार झाल्याची घटना काल रात्रीला १२:०० च्या दरम्यान घडली. Leopard vs tiger fight
ही घटना घडल्याची माहिती सिंदेवाही वनविभागाला मिळताचं तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनाक्रमाची शहानिशा केली. Tadoba tiger
त्यानुसार असे निदर्शनास आले की, पट्टेदार वाघ व बिबट यांच्यात जोरदार झुंज होऊन बिबट्याचा जागीच मुत्यू झाल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे. Wild animals
यावेळी सहाय्य्क उपवनसंरक्षक चोपडे, वनपरीक्षेत्र अधिकारी सालकर, क्षेत्रसहाय्यक बुरांडे, वनरक्षक व्ही. बी. सोरते, वनरक्षक सोरते, वनरक्षक येरमे व वनरक्षक राठोड यांच्या उपस्थितीत मोक्का पंचनामा करून बिबट्याचा शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.