News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील चिद्दरवार रुग्णालयात 8 फेब्रुवारीला गरोदर मातेसाहित बाळाचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात नातेवाईकांनी डॉक्टरवर हलगर्जीपणा चा आरोप करीत गोंधळ घातला.
जिल्ह्यातील भद्रावती येथे राहणाऱ्या 32 वर्षीय मोनिका राजेश आयतवार या प्रसूती साठी शहरातील रामनगर येथील चिद्दरवार हॉस्पिटलमध्ये 7 फेब्रुवारीला दाखल झाल्या होत्या.
Chiddarwar hospital chandrapur
Chiddarwar hospital chandrapur
मात्र 8 फेब्रुवारीला मोनिका ला अचानक दुखणे भरू लागले, प्रसूतीसाठी OT मध्ये नेण्यात आले मात्र त्याठिकाणी अचानक मोनिका चा मृत्यू झाला. Pregnant woman die
अचानक घडलेल्या या प्रकाराने नातेवाईकांनी डॉ. ज्योती चिद्दरवार यांना जाब विचारला, मोनिका यांचे भाऊजी निखिल तन्नीरवार यांनी डॉक्टरवर हलगर्जीपणा चा आरोप लावला.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली.
निखिल तन्नीरवार यांनी मोनिकाचा प्रसूती होण्याआधी व नंतरच्या अहवालात फेरफार केल्याचा आरोप लावला.
मात्र डॉक्टर चिद्दरवार यांनी नातेवाईकांचे आरोप फेटाळून लावत, मोनिका चा मृत्यू हृदयाघाताने झाला असल्याची बाब स्पष्ट केली.
मोनिका ला OT मध्ये नेण्यात आले असता अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला मात्र त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा मृत्यू झाला होता, मोनिका च्या पोटात असलेल्या बाळाला सुद्धा आम्ही वाचवू शकलो नाही अशी प्रतिक्रिया डॉ. चिद्दरवार यांनी दिली.
मोनिका चा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळेच झाला या आरोपावर निखिल तन्नीरवार हे ठाम होते, त्यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस तक्रार दाखल केली आहे.
मोनिका चा मृत्यू नेमका झाला कसा हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणारं.
या प्रकारानंतर चिद्दरवार हॉस्पिटलच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.