News34 chandrapur
चंद्रपूर:- जागतिक स्तरावरील दि.२९ जानेवारी २०२३ ला घेण्यात आलेल्या अलमा अबॅकसच्या १८ व्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील गणितीय उदाहरणाच्या (Mental Arithematic) सोप्या पद्धतीने उत्तरे काढण्याच्या या अभिनव स्पर्धेत स्पर्धकांना अवघ्या सात मिनिटात 120 प्रश्न सोडविण्याच्या स्पर्धेत ज्युनिअर गटातून चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राचे कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते गुणवंत कामगार देवराव कोंडेकर यांचा मुलगा चिं. ऋग्वेद कोंडेकर यांनी संपूर्ण जगातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
Abacus maths सोबतच अलामा अबॅकस परीक्षेची ग्रँड मास्टर ही पदवी सुद्धा मिळविली आहे. Abacus International Competition 2023
Abacus maths सोबतच अलामा अबॅकस परीक्षेची ग्रँड मास्टर ही पदवी सुद्धा मिळविली आहे. Abacus International Competition 2023
ऋग्वेद हा बिजेएम कारमेल अकॅडमी तुकुम चंद्रपूर इयत्ता सहावीचा विद्यार्थी असून तो ऊर्जानगर वसाहतीत राहतो.यावर्षी तिसऱ्यांदा आनलाईन पद्धतीने घेण्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगातील अमेरिका,आस्ट्रेलिया, मलेशिया, अबुधाबी, सिंगापूर,सौदी अरेबिया,भारत व इराण अशा अनेक देशातील हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. Abacus International Competition winner
तेलंगणा राज्याच्या हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या अलामा अबॅकसच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दिग्दर्शक जी.मुथुकुमार अय्यर, शिक्षिका मिनाक्षी नेरकर यांच्या हस्ते ऋग्वेदचा सन्मानपदक, सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र व पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. Alama Abacus International Competition
ऋग्वेद देवराव कोंडेकर यांनी पुढील वर्षीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगातून प्रथम येण्याचा मानस व्यक्त केलेला असून तो आपल्या यशाचे श्रेय अलामा अबॅकस ऊर्जानगरच्या शिक्षिका मिनाक्षी नेरकर मॅडम,आई मालू कोंडेकर,वडील देवराव कोंडेकर,बहीण ऋतुजा कोंडेकर व वाणी रामजी मॅडम, टी एस नेरकर सर,बी जे एम कारमेल अकॅडमी स्कुलचे प्राचार्य फादर बिनॉय आणि वर्गशिक्षिका कोमल मिश्रा यांना देत आहे.या घवघवीत यशाबद्दल ऋग्वेदचे उर्जानगर वासीय तसेच सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.