News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाघ व बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून आता या प्राण्यांनी पुढची वाट ही शहराकडे धरली आहे.
जिल्ह्यात पुन्हा मानव वन्यजीव संघर्षाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 3 नागरिकांचा या संघर्षात मृत्यू झाला आहे. Human Wildlife Conflict in chandrapur
चंद्रपूर शहरातील वृंदावन नगर परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून त्याने रविवारी दुपारच्या सुमारास परिसरातील सज्जनवार यांच्या घरी प्रवेश करीत मॅगी नामक कुत्रीवर हल्ला केला. Leopard attack
मॅगी चा आवाज ऐकल्यावर नागरिकांनी धाव घेत बिबट्याला पळवून लावले मात्र तो बिबट पुन्हा परत येईल अशी दहशत नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. Leopard attack human
काही दिवसांपूर्वी त्या बिबट्याने डुक्कर व गायी वर हल्ला चढविला होता, वृंदावन नगर परिसर हा चंद्रपुर महाऔष्णिक वीज केंद्राजवळ आहे, या वीज केंद्राला लागून ताडोबा जंगलाचा भाग आहे, त्या ठिकाणाहून वन्यप्राणी आता नागरी वस्तीत प्रवेश करीत आहे.
बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला चढविला मात्र पुढे तो मनुष्यांवर हल्ला करू शकतो अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने करावा यासाठी चंद्रपूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर यांच्याशी नागरिकांनी सम्पर्क साधत त्यांना माहिती दिली आहे. Chandrapur forest
आज 27 फेब्रुवारीला वनविभागाची चमू वृंदावन नगर भागात येणार असून त्याठिकाणी बिबट्या पुन्हा परत येऊ नये यासाठी उपाययोजना करणार आहे.