News34chandrapur
चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात 26 फेब्रुवारीला वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
वनविभागाचे रेंज पथक गस्त करीत असताना सायंकाळी वाघाचा मृतदेह त्यांना दिसला, मृतक वाघाच्या शरीरावर अनेक जखमा आहे.
सदर वाघ हा आधीपासून जखमी होता, तो वनविभागाच्या देखरेखीत असल्याची माहिती आहे. Tadoba tiger national park chandrapur
सदर वाघ हा दुसऱ्या वाघासोबत झालेल्या झुंजीत ठार झाला असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
चौकशीच्या औपचारिकतेनंतर वाघाचा मृतदेह चंद्रपूर येथील संक्रमण उपचार केंद्रात (टीटीसी) नेण्यात आला. सोमवारी सकाळी टीटीसीमध्ये शवविच्छेदन करण्यात येणार आहे. Jungle safari
या वर्षातील चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाचा हा सहावा मृत्यू आहे. याआधी 3 जानेवारीला ब्रम्हपुरी रेंजमधील शेतातील विहिरीत वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. 4 जानेवारीला सावली रेंजमधून सुटका करण्यात आलेल्या वाघिणीचा, 14 जानेवारीला गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर शेतात विजेचा धक्का लागून वाघिणीचा मृत्यू झाला होता. 14 जानेवारीच्या रात्री भद्रावती रेंज अंतर्गत माजरी. नंतर 5 फेब्रुवारीच्या रात्री पोंभुर्णा रेंजमधील घोसरी बीट अंतर्गत शेतात एका वाघाचा वीज पडून मृत्यू झाला होता. नंतर पूर्ण वाढ झालेला वाघ हिट अँड रन प्रकरणात ठार झाला होता. 12 फेब्रुवारी रोजी वरोरा रेंजच्या सीमेवरील पोथरा नदीत तरंगत होता.