News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यातील तब्बल 19 पोलीस निरीक्षक, 11 सहायक पोलिस निरीक्षक व 1 पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर तर्फे जारी करण्यात आले आहे. Police inspector transfer
जिल्हा विधी शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांची बदली गडचांदूर पोलीस स्टेशन, नियंत्रण कक्ष पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांची बदली पोलीस स्टेशन राजुरा, सायबर सेल चे संदीप एकाडे यांची बदली कोरपना पोलीस स्टेशन, नव्याने आलेले अनिल जिट्टावार दुर्गापूर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे यांची बदली मानव संसाधन विभाग चंद्रपूर, पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची जबाबदारी, घुग्गुस पोलीस स्टेशनचे पोनी बबन पुसाटे यांची नियंत्रण कक्ष येथे बदली, मूल पोनी सतिशसिंह राजपूत यांची बदली चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन, नव्याने आलेले आसिफराजा शेख यांची घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये बदली, नागभीड पोनी राजू मेंढे नियंत्रण कक्ष चंद्रपूर बदली, मानवी संसाधन विभाग पोनी सुनीलसिंग पवार यांची पडोली पोलीस निरीक्षक पदी बदली, नियंत्रण कक्ष चंद्रपूर पोनी सुनील परतेकी यांची पोलीस स्टेशन मूल येथे बदली, भद्रावती पोनी गोपाल भारती यांची नियंत्रण कक्ष येथे बदली, विपीन इंगळे आर्थिक गुन्हे शाखा यांची बदली भद्रावती पोलीस स्टेशन, ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक रोशन यादव यांची वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बदली, चंद्रपूर शहर पोनी सुधाकर आंभोरे यांची ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये बदली, नव्याने आलेले अमोल काचोरे यांची पोलीस स्टेशन वरोरा येथे बदली, वरोरा पोनी दीपक खोब्रागडे यांची आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे बदली, नव्याने हजर भीमराव कोरेटी यांची सुरक्षा शाखेत बदली, सहायक पोलिस निरीक्षक भद्रावती सुभाष मस्के यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर, अजितसिंग देवरे यांना माजरी पोलीस ठाण्याचा कारभार, संजय सिंह घुग्गुस यांची पोलीस अधीक्षक यांच्या वाचक पदी बदली, कोठारी पोलीस स्टेशनचे तुषार चव्हाण यांची सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये बदली, सिंदेवाही योगेश घारे यांची नागभीड पोलीस स्टेशनमध्ये बदली, सपोनि विकास गायकवाड बल्लारपूर यांची बदली कोठारी पोलीस स्टेशनमध्ये बदली, सपोनि जयप्रकाश निर्मल चंद्रपूर यांची विरुर पोलीस स्टेशनमध्ये बदली, गडचांदूर येथील गोरक्षनाथ नागलोत यांची धाबा येथे बदली, आर्थिक गुन्हे शाखा युवराज सहारे यांची बदली लाठी पोलीस स्टेशनमध्ये बदली, राहुल चव्हाण पोलीस स्टेशन विरुर यांची बदली नियंत्रण कक्ष चंद्रपूर, दोषसिद्धी कक्ष चंद्रपूर येथील सपोनि राजेंद्र वाघमोडे यांची वाहतूक शाखा चंद्रपूर येथे बदली, पोउपनी शैलेश यांची वणी कॅम्प मध्ये बदली. Chandrapur police
चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 31 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली मध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांना एकाही पोलीस स्टेशनचा कारभार देण्यात आला नाही.
मात्र पोलीस निरीक्षकांच्या अदलाबदलीने जिल्ह्यातील वाढत असलेली गुन्हेगारी नियंत्रणात येणार का हा मोठा प्रश्न आहे.
ज्यांना महत्वाचे पद दिले आहे त्यांच्या आधीच्या कार्यक्षेत्रातील तपास कामात अनेक दिरंगाई झाल्या आहे.