News34 chandrapur
चंद्रपुर :- तृतीय पंथीयाकडे बघण्याचा दृष्टिकोन अद्यापही बदललेला नाही. आज ही समाज त्यांच्याकडं हिणकस नजरन बघत असते. निसर्गान दिलेल्या या जन्माकड सकारात्मक दृष्टीन बघत अनेक तृतीयपंथीयानी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
LGBTQ Rally in chandrapur
LGBTQ Rally in chandrapur
आम्ही जसे आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे, प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं म्हणत चंद्रपुरातुन तृतीयपंथीयांनी "प्राऊड मार्च " काढत सर्वांचेच लक्ष वेधले, यात जिल्हा आणि जिल्हा बाहेरील तृतीयपंथीयानी सहभाग घेतला होता. संबोधन ट्रस्ट आजाद यांनी या मार्चचे आयोजन केलं होत. तृतीयपंथी व देह विक्री करणाऱ्या महिलांच स्थान निर्माण व्हावं, त्यांच्याकडे पाहण्याच्या भावना ह्या समान असाव्या. आम्हालाही समाजात आपल्या सारख सन्मानाने जगनाचा अधिकार प्राप्त व्हावा, अश्या भावना यावेळी तृतीयपंथीयांनी व्यक्त केल्या. Transgender