News34 chandrapur
चंद्रपूर/मोहर्ली - चंद्रपूर जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा एकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
चंद्रपुरातील ताडोबा मोहूर्ली बिटात 8 फेब्रुवारीला मोहूर्ली निवासी 59 वर्षीय नीलकंठ नारायण नन्नावरे व आडकू धोंडू जेंगठे हे सकाळी 11 वाजता कुंपणाकरिता बांबू तोडण्यासाठी जंगलात गेले होते. Tiger attacks
दोघेही मोहूर्ली 1 बिटातील कक्ष क्रमांक 874 मध्ये बांबू तोडत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने नीलकंठ नन्नावरे यांच्यावर हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्याने जेंगठे यांनी पळ काढला.
या हल्ल्यात नन्नावरे जागीच ठार झाले. Chandrapur tadoba
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे व पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
वनविभागाच्या वतीने मृतकाच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत करण्यात आली, यावेळी वनविभागाने गावकऱ्यांना जंगलात न जाण्याची विनंती केली आहे.