News34 chandrapur गुरू गुरनुले
मूल : पोलीस स्टेशन मूल येथे नव्यानेच रुजु झालेले ठाणेदार पो.नि.सुमित परतेकी यांचे मुल तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी यांचे कडून पुष्पगुच्छ देवुन स्वागत व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. Chandrapur police
काँग्रेसचे नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात कार्यरत असलेले मुल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (पत्रकार) गुरु गुरनुले, माजी अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष माजी न.प.उपाध्यक्ष राकेश रत्नावार, सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील मारकवार, विविध कार्यकारी सह. सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार, संचालक राजेंद्र कन्नमवार, ज्येष्ठ कार्यकर्ते माजी प्राचार्य बंडू भाऊ गुरनुले, सरपंच संघटनेचे अध्यक्ष भेजगाव ग्रा. पां. सरपंच अखिल गांगरेड्डीवार, आ उपसरपंच येंगंटीवार, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा रुपाली संतोषवार, माजी नगसेवक लीना फुलझेले, आदी उपस्थित होते, याप्रसंगी सर्वांचा परिचय देण्यात आला. पो.नी.सुमित परतेकी यांनी आपला परिचय देतांना नागपूर शहर पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेत कार्यरत होतो. अमरावती जिल्ह्यातही सेवा केली आहे. मुळचे नागपूर निवासी असलेले ठाणेदार सुमीत परतेकी यांनी नागपूर शहराच्या गुन्हे शाखेत सेवा केली असल्याने त्यांना गुन्ह्याचे स्वरूप, घडण्याची पध्दत आणि गुन्हेगारांचा चांगला अभ्यास आहे. वर्षभरापासून चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे वाचक फौजदार म्हणुन जबाबदारी सांभाळतांना मूल तालुक्याचा अभ्यास केला आहे. त्यामूळे मूल तालुक्यातील कार्य करतांना कायद्यान्वये कुठलाही भेदभाव न करता सहकार्य करील. आपणाकडून सुद्धा मला सहकार्याची अपेक्षा आहे. असा विश्वास बोलुन दाखवितांना सर्वांशी समन्वय साधून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित काँग्रेस पदाधिकारी यांना दिले.