News34 chandrapur गुरू गुरनुले
चंद्रपूर/मूल - सोमवारी 13 फेब्रुवारीला सकाळी मूल तालुक्यातील फिसकुटी गावातील 2 युवक कामावर जायला निघाले होते. Msrtc bus accident
Road accident
Road accident
मात्र आज कामावर जाण्याआधी त्यांच्यावर काळाने झडप घातली, मूल-चामोर्शी मार्गावरील बोर चांदली नदीच्या पुलाजवळ परिवहन विभागाची बस पलटी झाली, त्यावेळी बस खाली दोघे युवक चिरडल्या गेले, या अपघातात दोन्ही युवकाचा जागीच मृत्यू झाला.
Terribal accident
संदीप रामदास कोकोडे वय( 28 )वर्षे, प्रफुल उर्फ भाऊराव गुरनुले वय( 24) वर्षे असे मृतक युवकाचे नाव आहे.
मूल तालुक्यातील मौजा फिस्कुटी येथील संदीप रामदास कोकोडे वय 28 वर्षे, प्रफुल उर्फ भाऊराव गुरनुले वय 24 वर्षे हे एम एच 34 सीए 3704 ने मूल येथील राईस मिल येथे जात असताना परिवहन विभागाच्या बस क्रं. एम एच 07 सी 9158 ही मूल वरून चामोर्शीला जात असताना नदीजवळ पलटी झाल्याने त्या बसखाली येथुन दोघेही ठार झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. Chandrapur road accident
बस चालक कोटणाके असल्याचे समजले. घटनेची माहिती मुल पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक सुमित परतेकी आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहचुन शवउत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून मृतक युवक दोघेही मुल येथील जलाराम राईस मिल येथे काम करीत होते. दोघांपैकी मृतक संदीप कोकोडे यांना पत्नी व एक लहान मुलगा असल्याचे कळले. Fatal accident
अपघाताची माहिती मिळताच राजगड येथील सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील मारकवार उपजिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन मृतकाच्या कुटुंबाची चौकशी केली. आणि शासनाने मृतकाचे नातेवाइकांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली.