News34 chandrapur
चंद्रपूर - माता महाकाली येथील पोलीस मॉक ड्रिल दरम्यान पोलिसांकडून लावण्यात आले. यावेळी पोलीस यांच्याकडून"नारा ऐ तकबिर"च्या घोषणा या पोलिसांच्या अति उत्साहात झाल्या असून पोलीस अधीक्षक म्हणून याबाबत मला खेद आहे व यापुढे असा प्रकार कधीही घडणार नाही अशी ग्वाही पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी दिली.
संघर्ष समिती चंद्रपूरचे अध्यक्ष सुनीलदादा पाटील यांच्या शिष्टमंडळास पोलीस अधीक्षक यांनी सदर आश्वासन दिले. Police mock drill
11 जानेवारी रोजी चंद्रपूर महाकाली मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाने माँक ड्रिल केले. पोलीस आतंकवादी यांना अटक करताना नारे तकबिर, अल्लाहू अकबर अशी ही घोषणा दिली. याबाबतचा व्हिडीओ समाज माध्यमातून प्रसारित झाला. मुस्लिम समाज हा दहशतवादी आहे असा गैरसमज यामुळे पसरला. यामुळे मुस्लिम समाजा कडे पाहण्याचा दृष्टिकोन हा दूषित होईल व समाजा-समाजात दरी निर्माण होईल.
शांतिप्रिय महाराष्ट्रात घडलेली ही पहिलीच घटना आहे, चंद्रपूर महाकाली मंदिर येथील घोषणाबाजी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही होऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा येणाऱ्या काळात विविध सामजिक संघटना कडून संपूर्ण चंद्रपूर पोलिसांच्या विरोधात तीव्र आंदोलने करण्यात येतील असा इशारा देत संघर्ष समिती चंद्रपूर अध्यक्ष सुनील दादा पाटील यांचे नेतृत्वाखाली उपाध्यक्ष कुमार जुनमलवार, कोषाध्यक्ष मोहम्मद कादर शेख, सचिव अजय दुर्गे, सौरभ धोंगडे, संघटक डी. एस.ख्वाजा, हर्षद कानमपल्लीवर यांनी पोलीस अधीक्षक परदेशी यांना निवेदन दिले. यावेळी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी हा प्रकार अति उत्साहात घडला असून याबाबत दिलगिरी व्यक्त केली व यापुढे असा प्रकार घडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. Mahakali mandir chandrapur
