News34 chandrapur
चंद्रपूर: 25 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमांमध्ये मतदार नोंदणी, मतदान, निवडणुकासंबंधी काम करणारे पत्रकार व सामाजिक संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे. National Voter's Day 2023
लोकशाही टिकविण्यासाठी तसेच त्याचा ढाचा अबाधित राहण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र, ही जबाबदारी पार पाडत असतांना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेऊन यंदापासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी 'निवडणूक वार्तांकन पुरस्कार' दिला जाणार आहे. election reporting award तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ‘मतदार-मित्र पुरस्कार दिला जाणार आहे. 10 हजार रु. रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. पुरस्कार 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरित केले जाणार आहेत. पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वतः अर्ज करू शकतात. त्याकरीता मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्याची अहवाल स्वरुपात माहिती आणि छायाचित्रांसह आपला अर्ज democracybook2022@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावा. State election commission
अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर (मो.क्र. 8669058325) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे उपजिल्हा निवडणुक अधिकारी पल्लवी घाटगे यांनी कळविले आहे.
