News34 chandrapur
चंद्रपूर - 23 जानेवारी 2023 रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात, युवासेना-युवतीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा इंदिरा गांधी उच्च प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेला लागणारे साहित्य विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले. Balasaheb thackeray
सदर कार्यक्रमात उपस्थित युवा सेना जिल्हाप्रमुख माननीय श्री विक्रांत भाऊ सहारे,उपजिल्हाप्रमुख रोहिणी ताई पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख रिजवान पठाण, युवासेना शहर प्रमुख शिवा वजरकर, शहरप्रमुख शाहबाज शेख, युवती सेना शहर चिटणीस धनश्री हेडाऊ, आरती समुद्रलवार संतुष्टी बुटले, शारदाताई निरगुडवार, संगीताताई निरगुडवार पदाधिकारी उपस्थित होते.
उत्तम चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय भारत पारितोषिक देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

