News34 chandrapur
चंद्रपूर - हिंदु हृदय सम्राट वंदनीय स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९७ वी जयंती निमित्ताने उर्जानगर, सीटीपीएस कॉलनी येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सभासद आणि ऊर्जा नगर मधील रहिवासी यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. बाळासाहेबांनी पूर्ण आयुष्य मराठी माणसाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यसाठी खर्ची घातले, अख्या मुंबईवर शिवसेनेची सत्ता ही बाळा साहेबांची पुण्याई आहे. मातोश्री मध्ये बसून पूर्ण महाराष्ट्रावर लक्ष ठेवण्याचे कसब फक्त त्यांच्या मध्येच होते म्हणून आजही मराठी माणूस वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विसरला नाही आणि विसरणार नाही.

आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कोरडे यांनी केले तर प्रास्ताविक राजेंद्र भाऊ लहाने यांनी केले तसेच ज्येष्ठ नागरिक देवताळू यांनी मार्गदर्शनपर केले. याप्रसंगी मिलिंद कोटरंगे, नंदू भाऊ धंडागे, बंडू भाऊ पिपडशेंडे, पांडुरंग बोबडे, दादाराव वानखडे, दिलीप मोहोड, प्रकाश ठाकरे, सचिन शेलार, गजानन अरुडकर, विजय राठोड, बाळू चौखंडे, शिवदास घुले, उज्ज्वल सोनवणे तसेच ग्राम पंचायत सदस्य श्री. अनुकूल खन्नाडे, पंकज ढेंगारे, लोकेश कोटरंगे, सुरेश जाधव, जगदीश ढाले, अमोल नागरगोजे, प्रकाश मंगम, सागर शहा, भोजराज शिंदे ,विजय भोयर, सतीश कदिवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी, सभासद मंडळींनी याप्रसंगी वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आपल्या मार्गदर्शनामधून प्रकाश टाकला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुलजी बेले यांनी केले.