News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त 2 जानेवारीला गरजू व होतकरू विद्यार्थ्यांमध्ये शालेय किट चे वितरण करण्यात आले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच चंद्रपूर जिल्हा युवासेना प्रमुख पदी विक्रांत सहारे यांची नियुक्ती केली होती. Yuvasena party
त्यांच्या नियुक्ती नंतर अनेक युवक-युवतींनी युवासेनेत प्रवेशही केला.
चंद्रपुर जिल्ह्याची युवासेनेची धुरा सांभाळणारे विक्रांत सहारे यांचा 2 जानेवारीला वाढदिवस, वाढदिवस निमित्त कसलाही जल्लोष न करता त्यांनी होतकरू व गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. Chandrapur yuvasena
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहरातील इंदिरा गांधी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय किट चे वाटप केले.
यावेळी उपस्थित सर्वांनी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या कार्याचे कौतुक करीत पुढेही असा उपक्रम अविरत सुरू राहील असे आश्वासन दिले.
यावेळी शिवसैनिक महेश खंगार, पवन नगराळे, अजित पांडे, विक्की सिंग, कमलाकर कुलमेथे, युवासेना जिल्हा समनव्यक विनय धोबे, विधानसभा प्रमुख लोमेश कोटरंगे, उपजिल्हा अधिकारी रिझवान पठाण, शहर प्रमुख शिवा वझरकर, शहर प्रमुख शहबाज शेख, उपशहर प्रमुख वैभव काळे, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.
