News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.)वन परीक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील रोपवाटिकेच्या वन डेपोतील लाकडांना अचानक आग लागल्याने तेथील लिलावासाठी ठेवण्यात आलेली अनेक जातीची लाकडे जळली.
असल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. सायंकाळ पर्यन्त आग विझविण्यात वन विभागाला प्रयत्न करावे लागले. Fire in forest depo
असल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. सायंकाळ पर्यन्त आग विझविण्यात वन विभागाला प्रयत्न करावे लागले. Fire in forest depo
तळोधी वन परीक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथे वन विभागाची रोपवाटिका व डेपो आहे. या डेपोमध्ये अनेक सोसायट्यांची लाकडें आहेत. ही लाकडे लिलावाद्वारे व्यापाऱ्यांना विकली जातात. या अगोदर एप्रिल महिन्यात महावितरणच्या विद्युत तारांच्या घर्शनानेच आग लागली होती.पुन्हा शनिवारला याच डेपोमध्ये विद्युत महावितरण कंपनीच्या तारांना झाडांचा घर्षण होऊन आग लागल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली.असून यामध्ये जवळपास 30 बिट जळाली असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.यामध्ये लाखाच्या वर वनविभागाची नुकसान झालेली आहे.दरम्यान नागभीड येथील अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले असून सायंकाळ पर्यन्त आग विझविण्यात वन विभागाला यश आले.यावेळी तळोधी वन परीक्षेत्राचे अधिकारी गायकवाड, क्षेत्र सहायक एस. बी.वाळके, वनरक्षक एस. बी.पेंदाम, धनंजय येळणे, येरमे,आदी वनरक्षक, वनमजूर,व पी.आर टी चे सदस्य, 'स्वाब नेचर केयर' संस्थेचे सदस्य, आदींनी आग विझविन्याकरिता धडपड केली.
