News34 chandrapur
मुंबई/चंद्रपूर - आज पहाटे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व कार च्या भीषण अपघातामध्ये तब्बल 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. Horrible accident
पहाटे 5 वाजताच्या सुमारास ट्रक चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटले व विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, मृतकांमध्ये 4 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे.
सुदैवाने 4 वर्षीय बालक या अपघातामधून बचावला आहे. Mumbai-goa road accident
अपघात नंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.