News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील बाबूपेठ व लालपेठ भाग 15 जानेवारीला रात्री 9.31 वाजता अक्षरशः हादरुन गेले.
रात्री अचानक परिसरातील घरे हलायला लागली, भूकंप आला की काय असा भास होताच अनेक नागरिक घराबाहेर पडले.
लालपेठ परिसरातील अनेक नागरिकांनी वेकोली मध्ये सम्पर्क साधून विचारणा केली, भूमिगत खाणी मध्ये ब्लास्टिंग तर झाली नाही न? मात्र याबाबत वेकोली ने नकार दिला.
सदर बाब नागरिकांनी तहसीलदार निलेश गौड यांना सांगितली असता त्यांनी सुद्धा वेकोली प्रशासनाला विचारणा केली मात्र त्यावेळी सुद्धा वेकोलीने नकार दिला. Earthquake in Chandrapur
याबाबत जेव्हा भूगर्भ तज्ञ पर्यावरणवादी सुरेश चोपणे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की लालपेठ भागात अनेक भूमिगत खाणी आहे, त्यामध्ये काही बंद अवस्थेत असून खाणीच्या आत मोठ्या प्रमाणात भूगर्भातील काही कोसळल्याने सदर घटना घडली, याला छोटा भूकंप आपण म्हणू शकतो. Mini earthquake
ही बाब सध्या गंभीर नसली तरी येणाऱ्या काळात मात्र नागरिकांना याबाबत परिणाम भोगावे लागतील, घुग्गुस मध्ये जी भूस्खलनाची घटना घडली त्याची पुनरावृत्ती चंद्रपुरात होऊ शकते असा अंदाज चोपणे यांनी वर्तविला आहे.
सध्या तरी या मिनी भूकंपाची वेकोली व जिल्हा प्रशासनाने धास्ती घेतली आहे. Coal mine blasting
हा भूकंप होता की भूस्खलनाचा प्रकार याबाबत अजूनही काही स्पष्ट झाले नाही तरीपण नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.