News34 chandrapur
चंद्रपूर - 15 जानेवारीला रात्री 9 वाजून 31 मिनिटांनी शहरातील बाबूपेठ, लालपेठ व नांदगाव परिसरात भूकंपाचे हादरे बसल्याने नागरिक घाबरले होते.
मात्र हा भूकंप आहे की वेकोली ने केलेली ब्लास्टिंग याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही. Earthquake in chandrapur
मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील VolcanoDiscovery.com या वेबसाईटवर चंद्रपुरातील भूकंप आल्याची नोंद झाली आहे. Coal mine in chandrapur
भूकंप मापक विभागात याबाबत कसलीही नोंद झालेली नाही आहे, याबाबत चंद्रपुरातील भूगोल तज्ञ सुरेश चोपणे यांनी महत्वपूर्ण विधान करीत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. Coal mine blasting
शहरातील काही भागातील घरे 2 ते 3 सेकंद घरे हलायला लागली होती, यानंतर नागरिक चांगलेच घाबरून गेले होते, पण या घटनेचे मुख्य कारण हे त्या भागातील भूमिगत खाणी आहे. असे मत चोपणे यांनी व्यक्त केले आहे.
भूमिगत खाणीतून कोळसा काढल्यावर तिथे माती भरल्या जाते मात्र पुरेश्या प्रमाणात माती न भरल्यामुळे भूगर्भात भूस्खलन झाले असेल ही बाब नाकारता येत नाही. Landslide in chandrapur
जर असे काही घडले असेल तर त्या भागातील नागरिकांसाठी ही घटना म्हणजे धोक्याची घंटा आहे, यावर्षीच्या पावसाळ्यात अश्या घटना पुन्हा घडतील, त्याकरिता प्रशासन व वेकोली ने आधीच घटना घडू नये याची खबरदारी घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया चोपणे यांनी यावेळी दिली.