News34 chandrapur
चंद्रपूर - वर्ष 2019 ला पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला त्याठिकाणी भाजपने लक्ष केंद्रीत केले असून मिशन 144 अंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा लोकसभा क्षेत्राची चाचपणी करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आले आहे.
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा तब्बल 40 हजारांच्या वर मतानी पराभव झाला होता मात्र आता ती जागा पुन्हा परत भाजपकडे यावी यासाठी भाजपने 2024 ची तयारी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा स्वतः चंद्रपुरात दौऱ्यावर आले होते, चंद्रपुरात आगमन झाल्यावर त्यांनी विजय संकल्प सभेत हजेरी लावत कार्यकर्त्याना लोकसभा निवडणूक असो की विधानसभा भाजप ला चंद्रपुरात कमळ फुलवायचा आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
त्यानंतर चंद्रपूरची आराध्यदैवत माता महाकालीचे दर्शन त्यांनी घेतले, यावेळी मंदिर समितीने नड्डा यांचा सत्कार केला.
यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
यावेळी चंद्रपूर लोकसभेचे तिकीट कुणाला हा प्रश्न विचारण्याच्या प्रयत्नात असलेल्या पत्रकारांना
नड्डा यांनी बोलणे टाळत, नो कमेंट्स असा इशारा केला.
